आली पावसाची सर झाले सारे चिंब चिंब.
झाडॆ तरारली सारी पिउनिया थेंब थेंब.
आला सोसाट्याचा वारा मॄदूगंध रानोमाळ.
जसा चाले वारकरी दुमदूमे झांज टाळ.
आला पाउस अंगणी अन फ़ुलला मोगरा.
आता येतिल हो सण लेकी य़ॆतील माहेरा.
आता देउळा, राउळात मंत्रघोश घुमतील.
आणी रात्री थोर पोर बाया देव नामी जागतिल.
चार महिने लोकांचे आता सोवळॆ सोवळॆ.
कुणी खाती मांस,मच्छी त्यांना म्हणती ओवळॆ.
असा आला हो पाउस आले भरते आनंदा.
शब्द धावती कुठेही सोडूनीया वृत्त छंदा.......
No comments:
Post a Comment